STORYMIRROR

shubhangi arvikar

Romance

3  

shubhangi arvikar

Romance

वैलेंटायंज़ डे

वैलेंटायंज़ डे

1 min
11.7K


प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचं सेम असतं..

पण असं काही खास असतं

जे फक्त तुझं माझंच असतं..


ओठ स्तब्ध अबोल असतात 

डोळे मात्र बोलत असतात 

मूक भाव डोळ्यातून 

थेट हृदयात उतरत असतात 


मनाला सगळ उमजत असत 

डोळे मात्र हसत असतात 

ज्याचं त्याला समजत असत 

जे फक्त तुझं माझंच असतं 


सगळ्यान समवेत अनोळखी असतो 

फक्त आपला आपल्याला काळात असतं 

हे सगळं सांगण्यासाठी का 

वैलेंटायंज़ डे असावा लागतो 


जेव्हा पण दोन मन जुळतात 

तेव्हा वैलेंटायंज़ डे च असतो 


ग्रीष्म , वर्षा , हेमंत अथवा शिशिर असो 

वसंत हृदयी उमलत असतो 

वैलेंटायंज़ डे सदाच असतो 


असा काही खास असतं 

जे फक्त तुझं माझंच असतं 


प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचं सेम असतं..

पण असं काही खास असतं

जे फक्त तुझं माझंच असतं..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance