जगात ठरली भारी माझ्या भिमाची लेखणी
जगात ठरली भारी माझ्या भिमाची लेखणी
करुनी ग्रंथ पुस्तकाशी मैत्री
घेऊनी उंच ज्ञानाची भरारी
साऱ्या जगात ठरली भारी
माझ्या भिमाची लेखणी..!
स्त्री होती तेंव्हा गुलाम
तिची नव्हती कुणाला जाण
माझ्या भिमाच्या लेखणीने
आज मिळे तिला सन्मान
बा भिमाच्या पुण्याईने घेतली
त्यांनी आकाशाला भरारी
साऱ्या जगात ठरली भारी
माझ्या भिमाची लेखणी !!
लिहुनी घटना या देशाची भिमानी
साऱ्यांना दिले ते हक्क समान
अशी देण ही माझ्या भिमाची
ठरले जगी या भिम महान
आले हे सुख आमच्या दारी
आता नाही कश्याची कमी
साऱ्या जगात ठरली भारी
माझ्या भिमाची लेखणी !!
