Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Madhukar Harne

Tragedy

4  

Madhukar Harne

Tragedy

जारे जारे पावसा

जारे जारे पावसा

1 min
361


  जारे जारे पावसा,

  ऊन आता पडू दे

  शेतातील पीक,

  घरा आम्हा आणू दे!


  वरुणराजा रे तू

  त्राता रे आमुचा

  कारे असा कोपला,

  दुश्मना सारखा

  तोंडाशी आला घास,

 गळी आता उतरु दे

 सोन्याचे दाणे रे,

 हाती आम्हा लाभू दे!


 पेराया दिली साथ,

 आवनीही केली

 पीक आले जोमात,

 तुझीच कृपा झाली

 कारे आता रुसला,

 दया जरा येऊ दे

 जगाच्या या पोशिंद्याला,

 जरा सुखाने जगू दे!


 माणूस झाला कृतघ्न,

 केला पर्यावरणाचा नाश

 वरुणराजा तू मात्र,

 देवासारखाच वाग

 ऋतूचक्र तुझे रे,

 निसर्ग नियमाने चालू दे

पिकलेले धान्य आता,

 खळ्यामध्ये आणू दे!


 कोपलास तू अन् ,

 बेगडी माणुसकी बांधावर

 कैवारी जणू कृषकांचे,

 प्रसाद देवूनी हातावर

 पेरणी नांगरणी आवनी,

 मजूरी तरी सुटू दे

 श्रमाचे मोल किती,

 पांढरपेशांना कळू दे!!


जारे जारे पावसा ,

ऊन आता पडू दे

शेतातील पीक

घरा आम्हा आणू दे !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy