STORYMIRROR

Latika Choudhary

Inspirational

2  

Latika Choudhary

Inspirational

$ जाग पोरी $

$ जाग पोरी $

1 min
14.6K


 ऋतू गळीताच जाग पोरी

 उपाय शोधूच लाग पोरी

 कितीक गाफील भूलथापा

 मधाळ डोळ्यात नाग पोरी

 जपून ऐना पुसून घ्यावा

 उगाच जन्मास डाग पोरी

 किती सहाव्या झळा मनाने

 तमात चंद्र तू माग पोरी

 जिवास जाळू नको तू होळी

 सुखासवे खेळ फाग पोरी

 रवी जसा कुंकूला कपाळी

 अबोल मेंदीस आग पोरी

 फितूर होता सये रक्त ते

 जपून जोपास राग पोरी

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational