STORYMIRROR

Archana Rahurkar

Romance

4  

Archana Rahurkar

Romance

इष्काचा सागर

इष्काचा सागर

1 min
342

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात...

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातllधृll


पाऊल पडले तुमचे या महालात

सजवला मी मंचुकी हो स्वप्नात

दिला हाती तुमच्या माझा हा हात

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात 

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll१ll


साज-शृंगार केला मी हो तुमच्यासाठी

नेसली पैठणी पदरावरी मोराची नक्षी दाट

सांगा राया पाहू किती मी तुमची हो वाट

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात 

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll२ll


हाती चुडा हिरवागार किनकिनतो राया

बोलावितो तुम्हा उशीर झाला हो फार

गालावरी हळुवार खेळे झुबे कानात

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात 

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll३ll


कमरपट्टा शोभे कटेवरी होती माळ

पायात घुंगरू नाद करी हो मंजुळ

जीवाला माझ्या द्या तुम्ही सौगात

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात

अन् रंगूया चला हो इष्काच्या सागरातll४ll


दंगून जाऊ या पिरतीच्या खेळात

तुमचं रुप भरु द्या हो या डोळ्यात

मला जागा द्या हो तुमच्या हृदयात

राया जाऊ चला इष्काच्या सागरात

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll५ll


थरथरे अधर हो अंग अंग शहारी

चोळी दाटे अंगा जीव हा घाबरी

असे जवळी बसा हो सारी रात

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll६ll


मोहित करी अशी तुमची हो किमया

जीव जडला अशी तुम्ही लावली माया

देह वाहते तुमच्या पाया यावे दरबारात

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll७ll


भेटीत राया मी हो सांगते सारं

मज सोसंना आता यौवनाचा भार

काळजात रुते काटा होऊ द्या बात

राया जाऊ चला हो इष्काच्या सागरात

अन् रंगूया चला इष्काच्या सागरातll८ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance