हरवलेली माणुसकी
हरवलेली माणुसकी
बघा कुणीही कायमचं घाईत
मुक्कामी पाहुणे थांबत नाहीत
थांबणारयांना हूडकवतात काही
माणुसकी जर उरलीच नाही
वानूळ्याची प्रथा मोडून गेली
मुराळनिची शिदोरी आडून राहिली
पत्रप्रेम राहिलं नाही
माणुसकी जरा उरलीच नाही
मोबाईल तातडीने केली घाई
निरोप चिठ्ठीच्या अगोदर जाई
बसाया टाकण्याचा विषय नाही
माणुसकी जर उरलीच नाही
खरं काय चाललं सांगतं कोण?
बोलणं टाळणे कानाला फोन
चहापान घ्या बोलणं राही
माणुसकी आता उरलीच नाही
मुली मागतात भावात हिस्सा
भाउबहीणीचा वाट्याचा किस्सा
आइबापाला कोणी वाली नाही
माणुसकी आता उरलीच नाही
आई मोठ्यात लाजे काजी
बाप लावण्यात घटका मोजी
मूळ माहेर खालवर पाही
हरवली माणुसकी उरलीच नाही
