हमामा हुबरी खेळती
हमामा हुबरी खेळती
हमामा हुबरी खेळती एक मेळा ।
नानापरींचें गोपाळ मिळती सकळां ॥१॥
एक धावें पुढें दुजा धावे पाठीं ।
एक पळें एकापुढें एक सांडोनि आटी ॥२॥
ऐसें गुतलें खेळा गाई धांवती वनीं ।
परतेनाची कोण्हा एका जनार्दनीं ॥३॥
