हिशोब
हिशोब
पानाफुलांच्या लगटीन ,
आली सय ही कुणाची?
आडून आडून आठव येई ,
रंगलेल्या त्या मैफलीची
होई बघ पानांची गळती,
आता डाव सोडू म्हणती
बुंधा नाही अजून जरड,
काळ्या मातीचे कण म्हणती.
दह्या दुधाच्या त्या चवीनं,
प्रेमजीवन खूप रंगलं
आंबटाच्या समवेत बघ,
दुध कसं ओसंडून आलं
दावू कुणा-कुणा मी ,
ठेव ही सुगंधी पेटीतली.
जन्मोजन्मीच्या हिशोबानी ,
माझ्यासमवेत ही आली
