ही रात्र कशी
ही रात्र कशी
या निळ्या गर्दाईत
चांदण्याचे गाव,
चंद्र आकाशात निजला
रात्र त्याचे नाव!!
एक लुकलुकता तारा
तुटून पडला जमिनीवरी,
माझी सखी ताऱ्याला बघून
मागते त्याला काहीतरी!!
सुटला थंडगार वारा
मी देत होतो पहारा,
मी एकटाच जागा
मला ना कुणाचा सहारा!!
या चांदण्यांच्या रात्रीत
काय करु सुचत नव्हतं,
शब्द पुटपुटत होते
कवी मन झोपू देत नव्हतं!!
लिहित बसलो काहीतरी
रात्री मागे धावून,
मी मात्र आलो
स्वप्नाच्या गावी जाऊन!!
स्वप्नाच्या दुनियेत
परीचं गाव होतं,
तिथे माझे वेडे गाणे
कुणीतरी म्हणत होतं!!
हा भास माझ्या स्वप्नाचा
किती छान वाटतोय,
डोळ्यात माझ्या मी
स्वप्नाचे गाव रेखाटतोय!!
उठऊ नका मला रे
मी स्वप्नात धुंद आहे,
हरवलो मी रात्रीत
मन माझे दंग आहे!!
आज काय घडत आहे
सरकते डोक्याखालची उशी,
आज जागे राहावं वाटतंय
ही रात्र तरी कशी!!

