गवळण-मथुरेचा घाट
गवळण-मथुरेचा घाट
चालून चालून पाय हे थकले
दुःख तय म़ाझी पाठ ......
गं बाई बाई ....मथुरेचा हा घाट
मी चालू कशी मथुरेचा हा घाट llधृll
थकले बाई मी कामाने
अंग हि भिजले घामाने
भलतीच वळणाची ही वाट
गं बाई बाई.....मथुरेचा हा घाट ll१ll
पडते मी तुझ्या पाया
धाऊनी ये वाजवत पावा
हात दे तु धर हा माठ
गं बाई बाई ....मथुरेचा हा घाट ll२ll

