गुन्हा !!
गुन्हा !!


असा काय असतो माझा गुन्हा?,
की होतो माझ्यावर अत्याचार पुन्हा पुन्हा,
सुरक्षितता म्हणजे काय तेही मला कळू द्या,
त्या आरक्षणा सोबत हे ही जरा मिळू मला द्या,
मी ही एक कळीच असते,
पण फुलण्या आधीच कोमेजली जाते,
दोष तर निघतात माझ्याच मध्ये,
आणि कोणी म्हणत जायचं ना सातच्या आत घरामध्ये,
त्याने कसाही स्पर्श केला तरी चालतो,
कारण तो शेवटी पुरुष असतो,
मिळेल त्याला कुठेंना कुठेतरी शिक्षा,
पण मला मात्र मिळतात फक्त उपेक्षा,
काहीजण पेंटवतात मेणबत्त्या,
तर काही काढतात एखादा मोर्चा,
काहींचा असतो व्हाट्सअप्पचा डीपी काळा,
तर काही बोलतात वाईट झालं घेतांना चहाचा सुरका,
ही पेटलेली आग थोड्याच वेळेत होते शांत,
पण तो मात्र कोणत्या ना कोणत्या रूपात राहतो जिवंत.