घरातली 'ती'
घरातली 'ती'
सहन करते प्रत्येक
क्षणाचे 'ती' चटके
लग्नकार्यात तिचा अंदाजही
असतो कधी जरा हटके
प्रत्येकाला जपण्याचा जणू
विडाच घेतलाय तिने
कधी सुखाची चाहूल लागली
तर हसतेहि ती गोड कौतुकाने
कधीतरी 'ती' सुखाने
जगण्यासाठी धाडसही करते
घरात दुःखाचा क्षण आला
कि 'ती' लगेच रडते
'ती' असते म्हणूनच तर
घर शोभून दिसते
अंधाराच्या काळोखात उजेड
करणारी पण तीच 'ती' असते
आपल्या मुलाला संस्काराचे धडे देणारी
'ती' पण गुरुजनांचीही गुरु असते
म्हणून या तिच्या वात्सल्यातही
सारं जग फसतांना दिसते
पत्नी, सून, बहीन, आई, या साऱ्या
नात्यांना जपणारी पण ती एकटीच असते
आयुष्याच्या साऱ्या खेळात आपल्याला जपणारी
खरंच 'ती' किती ग्रेट असते
