घर की मुर्गी दाल बराबर
घर की मुर्गी दाल बराबर
आजची कविता सर्व गृहिणींना अर्पण करीत आहे
एक स्त्री नोकरी करते, तेव्हा ती पांच-सहा जणांना रोजगार देते
पण एक स्त्री घर सांभाळते, तेव्हा ती पूर्ण जग सांभाळत असते
गृहिणी
गृहिणी चे दुःख हे, आणखीच वेगळे असते
कितीही केले तरी, तिला काय काम आहे हेच म्हणणे सगळ्यांचे असते
घरचे किचन, मुलांचा अभ्यास, नवऱ्याची मर्जी सांभाळत असते
वयस्कर सासू-सासऱ्यांची सेवा ती करीत असते
गृहिणीला आपल्या या कामाचा, पैसा कधीच नको असतो
प्रेमाचे दोन शब्द आणि मान, तुमच्या कडून तिला हवा असतो
वाह, सुंदर, मस्त हे शब्द, फेसबुक वर खिरापती सारखे वाटत रहातो
आणि घरच्या गृहिणीला मात्र, या पासून आपण नेहमी वंचित ठेवतो
फेसबुक वर मैत्रिणी मिळविण्यासाठी, धडपडत आपण करीत असतो
पण या गृहलक्ष्मी कडे आपण, मैत्रीण म्हणून कधीच पहात नसतो
संसारा साठी तिने, आपल्या भावनांची तिलांजली दिलेली असते
मग प्रेमाचे शब्द ऐकण्याची, तिची ईच्छा काय चुकीची असते
नाही मागत ती दाग-दागिने, उंची अत्तर अन साड्या हि मागत नसते
वाढदिवसाला तुम्ही एक गजरा द्यावा, असे तिला मनातून वाटत असते
घर सांभाळते ती, म्हणून पुरुष उंडारु शकत असतो
सहली आणि दारू पार्टी, एन्जॉय तो करू शकतो
तिला हि मन आणि भावना आहेत हे कधी विसरू नका
तुमच्या विश्वासावर आलेलीचा, केसाने गळा कापू नका
घरकी मुर्गी दाल बराबर, असे या गृहिणीला कधी मानू नका
फक्त घरकामाला अन शेजेला ती आहे असे कधी समजूू नका
