STORYMIRROR

Ajit K

Others

2  

Ajit K

Others

स्त्री शक्तीला सलाम

स्त्री शक्तीला सलाम

1 min
42

सदर कविता ही नोकरी करणाऱ्या स्त्रीला अर्पण करीत आहे. नोकरी व घर दोन्ही सांभाळणाऱ्या या शक्तीला माझा सॅल्युट.

-------------------------------------------------


हिच्या मुळे, पैसे मिळतात धुणी भांडी करणारीला

नोकरी हि मिळते, केरवारे करणाऱ्या बाईला

मुले सांभाळणारी पण, अर्थार्जन करू शकते

जेवण बनविणारी देखील, हिच्यामुळे स्वतःचे घर चालवू शकते

म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळणारी, घेत असते पैसा

हिच्याच जीवावर क्लास वाले, कमावतात बक्कळ पैसा

दुनियाचे अर्थचक्र, हीच जणू सांभाळत असते

स्वतःहि कमविते, आणि दुसऱ्यांचे संसार पण चालवीत असते

किळसवाण्या नजरा टाळत, जिवावरचा प्रवास ती करीत असते

वखवखलेल्या स्पर्शा पासुन,स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न ती करीत असते

नोकरी करून सुद्धा, ती सणवार-नातलग सांभाळून असते

समाजात आदर आणि सन्मान, स्वकष्टाने ती मिळवीत असते

चेहऱ्यावर असूया अन मनातून राग तिचा आपल्याला येत असतो

पण मिळणारा पैसा बघून, हसत हसत राग आपण गिळलेला असतो

काम, नोकरी, नवरा, अन मुले सांभाळताना पिट्ट्या तिचा पडत असतो

केवळ लावते नावं म्हणून, हक्क तिच्या पगारावर नवरा सांगत असतो

संसाराचा स्वर्ग करण्यासाठी, श्रम आणि पैसा ती देत असते

पण दरवाज्यावर पाटी मात्र, नवऱ्याच्याच नावाची असते

एवढे सगळे करून सुद्धा, जेव्हा कधी उपेक्षा पदरी तिच्या येते

जगातील सर्वात कमनशिबी स्त्री, हि नोकरदार स्त्रीच ठरते

घर कि मुर्गी दाल बराबर, असे हिला समजू नका

हि आहे म्हणून तुम्ही आहात, सत्य हे कधी विसरू नका


Rate this content
Log in