STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Action

3  

Sanjay Ronghe

Abstract Tragedy Action

एकच ही पाऊलवाट

एकच ही पाऊलवाट

1 min
319

एकच ही पाऊलवाट

होतात पावले भारी ।

फिरत राहतो सारखा

हरवलो दिशा चारी ।


नागमोडी वळणं त्यात

नको वाटतात सारी ।

सम्पता कधी सम्पेना 

कठीण जीवनाची वारी ।


बघतो वळून मागे जेव्हा

येते डोळ्याला अंधारी ।

पुढे पुढे मी जाऊ कुठे

करी दंश साप विषारी ।


चालवेना आता थकलो

विसावा हवा थोडा तरी ।

थांबतील हे श्वास कुठे

संपेल का केव्हा तरी ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract