STORYMIRROR

Shrddha Adane

Romance Others

3  

Shrddha Adane

Romance Others

एकांत

एकांत

1 min
222

तो एकांत होता माझा आणि त्याचा,

तेव्हा सारे जग त्याच्या विरहाने पडले

पण मी मात्र त्याला बोलण्याच्या नादात,

त्याच्याचं प्रेमात पडले...........

मनात खूप शब्द होते,

त्याला बोलण्यासाठी

पण एव्हढा एकांत असूनही,

त्याला मी बोलू शकत नव्हते.........

कारण मनात एकचं भीती होती,

" तो मला नकार देणार तर नाही न "

पण माझी भीती मात्र आमच्या,

दोघांच्या एकांतात खरी ठरली

आणि त्याच्या बोलण्यातून कळालं,

त्याला पहिली प्रेयसी होती..........

तो माझ्या समोर या एकांतात बसलेला होता,

मला खरचं काय बोलू

काहीचं कळत नव्हतं,

पण तरीही मी त्याचा हात धरून म्हणाले..........

खरचं रे कुणीतरी आवडणं खूप सोप्प असतं

आणि कुणाच्या तरी आवडीचं होणं खूप,

अवघड असतं

असं म्हणून मी या एकांतातून त्याच्या,

जवळून कायमचीच निघून गेले............


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance