STORYMIRROR

Shrddha Adane

Others

3  

Shrddha Adane

Others

भाऊला-बहुलीचा डाव

भाऊला-बहुलीचा डाव

1 min
204

काल हळद लागली माझ्या अंगाला,

पण ती तुझ्या नावाची नव्हती

सगळे जण खूप उत्साहीत होते,

पण मीचं एकटी का अनामिक पडले होते.............

आज झरझरीत मी लाल रंगाचा शालू नेसला होता,

थोडयाचं वेळात मी उभी राहणार होते पाठावर

पण मी वाट बघत होते,

माझ्या बाजूला उभं राहशील का तू चौरंगावर...........

तुला आवडणार मोगरा देखील,

माळलाय मी माझ्या वैणीत

पण मलाचं नकोसा झाला होता त्याचा सुगंध,

कारण कणभर इच्छा नसतांनाही

दुसऱ्यांसोबत मांडलाय माझ्या लग्नाचा थाठं...........

सप्तपदी घेतांना आठवत होत्या मला,

आपण दोघांनी घेतलेल्या शपथ्था

पण आपल्याचचं आठवणी या यज्ञकुंडात,

जळतांनाही दिसत होत्या मला....................

तू दिलेला काळा दोरा मी हौसेने घालत होते,

कारण आपल्या प्रेमाचं एक प्रतिक म्हणून

पण आज ह्याचं दोन तोळया मंगळसूत्रा सोबत,

ठेवलंय मला त्याच्यासोबत भांदून.................

त्याने लावलेला सिंधूर,

फक्त एक रंग आहे माझ्यासाठी

शरीराने असेल मी त्याची गुलाम,

पण अजूनही माझं मन उडतय फुलपाखरा सारखं

तुला मिळवण्यासाठी.....................

निरोप घेतांना माहेरच्यांचा,

वाटतं तुला एकदाचं मन भरून पाहावं

जाते मी आत्ता सासरी,

पण तू ही आत्ता मोडून टाकं

अर्धवट राहिलेला आपला,

बाहुला-बाहुलीचा डाव..........................


Rate this content
Log in