दोन धृवांवर दोघे आपण.
दोन धृवांवर दोघे आपण.
तो विश्वास असो वा प्रेम ते अदृश्य असते.
ज्यांना तोड नसे, असेही ते जिंकते.
तुझी या जिवा प्रेमळतेची गरज भासते.
दोन धृवांवर दोघे आपण भासताच हृदय मात्र दाटते.
संपले आता सर्व असे तू सहजच सांगते.
विचारांची जोड नाही, हे वागणुकीतून कळते.
नात्यास संगत असण्यास प्रेमाची जाण लागते.
दोन धृवांवर दोघे आपण भासताच हृदय मात्र दाटते.
आठवण येताच अश्रू ही घर करून बसते.
आता मला माझीच सावली पायाखाली दिसते.
ती स्वतःच्या काळजावर घाव घालीत फिरते.
दोन धृवांवर दोघे आपण भासताच हृदय मात्र दाटते.
कोरडया त्या दिवशीही पावसात मन भिजते.
तुझ्या चेहऱ्याला फक्त हे माझे हास्य शोभते.
तुझ्या नकारात्मकतेने हृदयातले दिवे विझते
दोन धृवांवर दोघे आपण भासताच हृदय मात्र दाटते.
हे मन पुन्हा सैरा-भैरा होऊन तुझ्यातच गुरफटते.
प्रेमाच्या या गाठीला तुझेच विचार उसवते.
तरी ही पावले तुझ्याच सोबत चालते.
दोन धृवांवर दोघे आपण भासताच हृदय मात्र दाटते.
हे मन तर आजही तुझ्या त्या प्रेमात गुंतते.
का बर ग? सखे आज तू पाठ फिरवते.
परत तुझी जीवनी येण्याची मनालाही चाहूल लागते.
दोन धृवांवर दोघे आपण भासताच हृदय मात्र दाटते.