Rama Khatavkar

Romance


4  

Rama Khatavkar

Romance


दोन डोळ्यांच्या काठाला

दोन डोळ्यांच्या काठाला

1 min 208 1 min 208

दोन डोळ्यांच्या काठाला

नीज केव्हाची अडून

आत यावया लाजते

कोणी बसले लपून.  ||१||


दोन डोळ्यांच्या काठाला

रेषा काजळ रेखिली

छबी सख्या साजणाची

ऐन्यामध्ये निरखिली.   ||२||


दोन डोळ्यांच्या काठाला

थवा उतरे स्वप्नांचा

चारा कोवळया आशेचा,

चुरा चांदणं मोत्यांचा.  ||३||


दोन डोळ्यांच्या काठाला

रोजचीच ये-जा झाली,

रानामध्ये आठवांच्या

चिंब पहाट भिजली.   ||४||


दोन डोळ्यांच्या काठाला

आज अशा सांजवेळी

मन कातर कातर,

भास करतात खेळी.   ||५||


Rate this content
Log in

More marathi poem from Rama Khatavkar

Similar marathi poem from Romance