देखणी
देखणी
तू लाल सफरचंदासारखी चिकणी
लोक बंद पाडतील माझी लेखणी.......
अगं राणी एक तूझी लाल साडी
तू उगीच काढू नको माझी खोडी
दिसतेस तू गं परीहून ही देखणी.......
झालं वाटेत भांडणं सारा गाव गोळा
मी ना भांडखोर एकदम साधा भोळा
मनं करे गप्प बसू सतावते तूझी वेणी.....
माझा जीव तूला पाहून होतो वेडा
भेटायला आलो बाप रस्त्यात खडा
आता सांग कशी लिहू मी प्रेमाची गाणी....
अगं काल संगम होता तुझ्या समोर उभा
मला कळला ना तुझ्या प्रेमाचा मनसुबा
अगं चल मी तुझा तूच माझी गं साजणी......

