Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

चित्त नेले चोरून....

चित्त नेले चोरून....

1 min
276


पहिल्याच भेटीत सखे मज गं

घायाळ गेलीस करून ।

रिक्त झाली काया माझी

तुने चित्त नेले चोरून ।।धृ।।

आली समोरून अशी तू गं

जणू काही स्वर्गपरी ।

मोहित झाले नयन माझे

शिरली तू गं अंतरी ।

अकल्पित घडले हे गं सखे

गेलो मी तुला सारे हरून ।

रिक्त झाली काया माझी

तुने चित्त नेले चोरून ।।१।।

कर्ण मधुर वाणी तुझी

वाटे बोलत राहावे तुझ्याशी ।

धन्य होईल मी जर का तूने

प्रितीचे नाते जोडले माझ्याशी ।

ठेवले तुझ्या रुपाला मी

नयनी माझ्या भरून ।

रिक्त झाली काया माझी

तुने चित्त नेले चोरून ।।२।।

मनमोहिनी तू,चित्तहरीनी तू

आहेस लावण्याची राणी ।

बघून तुझ्या रुपाला गं

दूर होते सारी ग्लानी ।

जपून ठेव माझ्या चित्ताला तू

जाईल नाहीतर मी मरून ।

रिक्त झाली काया माझी

तुने चित्त नेले चोरून ।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance