चांदण्याची गढी
चांदण्याची गढी
बाई !
चांदण्याची गढी तिला गोऱ्या गोऱ्या माळा,
मुखी उजेड घेऊनी उभा दारात कावळा;
रंग सांडल्या रानांत पक्षी कापूस पिंजतो,
गहिवर येता पानी तरु मोत्यांना पेलतो;
इथे तिथे, इथे तिथे साऱ्या चांदण्या दिपल्या,
गर्द निबीड रानांत काही दारात गोंदल्या;
बाई ! चांदण्याची गढी तिला सोन्याची किनार,
साऱ्या अंतराळी देते गंध, अमृताची धार;