चाहूल
चाहूल
शब्दांनी उठले तरंग
जाऊन बसले मनी
भावनांची नाजूक कळी
उमलली माझ्या हृदयी।।
शब्दा शब्दातून बहरली
प्रीतीची सुंदर गाणी
कळलीच कशी नाही
प्रेमाची चाहूल न्यारी।।
तुझी ती साद
हृदयात मिसळली जाई
तू दूर तरीही
जवळ वाटून राही।।

