STORYMIRROR

Smita Killekar

Tragedy

4  

Smita Killekar

Tragedy

बरसान

बरसान

1 min
343

पड रे पावसा बैजवार नको करू येड्यावानी

तुला न्हाई का दिसतं माझ्या डोळ्यातील पाणी

माझा फाटका संसार त्याला हजार ठिगळ

खाली काळी धरती माय वर बाप मोकळं आभाळ


रिकामी उतरंड संपली धान्याची बेगमी

 मुखी लेकरांच्या काय घास घालू मी

 करपलं पिक सार सार शिवार भयाण 

 पिलांसाठी फिरे ती व्याकूळ पक्षींण 


 नाही वैरण चारा पाणी गोठ्यात गाय हंबरते

 तिच्या डोळ्यातील करूणा माझे काळीज जाळते 

 कर्जाचा डोंगर वाढे सावकाराचे रिण 

 दुःख विसरे नवरा दारू ढोसून


 नाही दुरडीत भाकर कोपऱ्यात रिकामी घागर

 निजली उपाशी पोरं तुला नाही का पाझर 

 कर कर बरसान तुला घालते मी आण 

 न्हाई तर माझा धनी घेईल झाडाला टांगून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy