STORYMIRROR

Smita Killekar

Others

3  

Smita Killekar

Others

झिम्माड पाऊस

झिम्माड पाऊस

1 min
275

रिमझिम हा पाऊस

झोंबे गार गार वारा

गर्द हिरव्या रानात,

मोर फूलवी पिसारा

चिंब भिजल्या सरीत,

थेंब झेलीत टपोरा

काळ्या मातीच्या कुशीत

फुटे अंकुर बीजाला 

केतकीच्या ग, बनात

मत्त सुगंधी फवारा

धुंद नागिण डोलत

खडा देई तो पहारा

झिम्माड हा पाऊस

आठवणीच्या गं धारा

सर्द भिजल्या देहात

गंध भरला मोगरा

ऊन पाऊस खेळात

शोभे श्रावणाची सर

ऋतुच्या या सोहळ्यात

झाला जीव अलवार


Rate this content
Log in