ब्रम्हानंद
ब्रम्हानंद
अंतरीचा आनंद
शोधतो मी खास
जाणवे मज त्यात
ईश्वराचाच वास १
अंतःकरणी राहे
सावळा माझा नित्य
त्याविना नाही दूजे
सांगतसे मी सत्य २
ब्रम्हानंद भरला
अंतरंगी सर्वत्र
हृदयी रेखिले मी
या गोविंदाचे चित्र ३
तिन्ही लोकी आनंद
दिसतसे मजला
जव कृष्ण सख्याचा
हृदयी वास झाला ४
अवघेची त्रैलोक्य
आनंद मजसाठी
हरवे माझे चित्त
सावळ्या कृष्णासाठी ५