ब्रह्मराक्षस बळावला
ब्रह्मराक्षस बळावला
ब्रह्मराक्षस बळावला
अमानुष वासनांध झाला
नीतिमत्ता माणुसकी
लोप पावत चालला
फक्त बाहेरच नव्हे
घरातही खेळ मांडला
सुरक्षित नाही लज्जा
असा हा डाव सजला
वासनांध असा बरसला
भुकेने व्याकुळ झाला
घायाळ शरीरासमेत
मनाला जखमी करून गेला
ती निपचित घायाळ हरिणी
दूषणे समाजाची झेलत होती
न्यायासाठी तिची राहिलेली
लक्तरे वेशीवर टांगली गेली
वर्षांनंतर वर्षे सरली
"ती" मात्र चरित्रहीन राहिली
पुरुषार्थ गाजवणारा "तो"
समाजात उजळपणे वावरी
अश्याप्रकारे स्त्री शक्तीचा जागर झाला
..................स्त्री शक्तीचा गजर झाला...
