STORYMIRROR

abhijeet kharat

Tragedy

3  

abhijeet kharat

Tragedy

भिकारी

भिकारी

1 min
13.6K


आज निघालोच बाहेर भिकारी शोधण्यासाठी

गल्ली-गल्ली चप्पा-चप्पा फिरलो

उल्थ-पाल्थ केलं सारं शहर

दिसले-भेटले सारे-सारे 

एक रोटी मागित, एक पैका,

एक कापडं नी एक-एक काय-काय

मात्र मावळत्या सूर्याला जेव्हा जमले ते सारे

दिसले-भेटले भरवताना एकमेकांना चिमुकला पण आनंदाचा घास 

प्रेमाच्या नी मायेच्या गप्पा, डोळ्यात-डोळे घालून करताना, एकमेकांना बिलगून झोपेत,

इवलस पोट, मात्र मोठं मन, दोन्ही ही काठोकाठ भरलेले...

तेव्हा मीच मात्र भिकारी बनून बसलो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy