STORYMIRROR

pradip waghmare

Inspirational Others

3  

pradip waghmare

Inspirational Others

बहीण -भावाचे नातं

बहीण -भावाचे नातं

1 min
199

काय म्हणून काही माहिती झोप मला आज येत नव्हती।

कारण हेच की आज जणू तुझ्यावर कविताच बनणार होती ।।


जीवनातील प्रत्येक कठीण क्षणांना सामोरे जाण्याची ताकत तुझ्यात आहे।

म्हणूनच देवाने तुला समजूतदार भाऊ प्रदीप दिला आहे ।।


जेव्हा तुझ्याकडे आलो होतो तेव्हा खूप काही सांगेल असा विचार करून आलो होतो।

पण असं काय झालं माहित नाही की मी तुझ्यापासून दोन दिवसात दूर गेलो।।


मला माहित नाही देव आपल्या भेटीला नकार देत आहे की नाही।

पण एक सांगू आपली भेट होण्यापासून कोणाचा बाप सुद्धा रोखू शकत नाही।।


मला माहित नाही तुझ्या ह्या भावाची तुझ्या मनात किंमत आहे की नाही।

पण तुला एक सांगतो जगात काही झाले ना तरीही तुझ्या बद्दल माझ्या मनात अनमोल किंमत राहील।।


जेव्हा आपण गणपती काढत होतो तेव्हा मी तुला आणि तू मला खूप काही सांगीतले।

तेव्हाच माझ्या जीवनात असं काही झाल आणि मला वाटु लागले मी माझ्या बहिणी शिवाय राहू शकत नाही।।


आजचा दिवस तुझा आहे एक स्मित हास्य देऊन दे ।

विचार न करता भविष्याचा आजचा क्षण तू जगून घे।।


तुझ आयुष्य असो सदाफुली सारखं सदैव बहरणारं।

संकट आले कितीही तरी त्यांना मार्ग दाखवणारं।।


फ्युचर च प्लानिंग करताना मागे वळून कधी पाहू नको ।

तुझा एक लाडका भाऊ तुझ्या पाठीशी आहे हे कधी विसरू नको।।


होतील त्याच्या मनोकामना पूर्ण आशीर्वाद देवाचा तुला आहे I

सुखी राहो नेहमी तू एवढीच मागणी देवाला माझी आहे।।


पण शेवटी एवढेच लक्षात ठेव हा तुझा भाऊ तुझ्या जीवनात खूप खुशी आणून देईल।

पण, ही खुशी फक्त तुझीच असेल, माझी नाही।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational