भाव माझ्या मनीचे
भाव माझ्या मनीचे
कसे सांगू तुला, भाव माझ्या मनीचे,
तू आहेस का?
कसे सांगू तुला, माझी अबोल प्रीत,
तू ऐकणार का?
कसे रिते करू माझ्या भावनांचे ढग,
भिजायला तू आहेस का?
कसा घेऊ अनुभव तुझ्या स्पर्शाचा,
सहवास तुझा आहे का?
शोधते मी तुला आयुष्याच्या या वळणावर,
अखेर साथ तुझी मिळेल का?