STORYMIRROR

Nitin Jadhav

Inspirational Tragedy

1.0  

Nitin Jadhav

Inspirational Tragedy

भाकर

भाकर

1 min
29.8K


पोथरा फिरवून सजवलेली चूल 

चुलीत संथ जळणारी बाभळीची लाकडं 

त्यावर लोखंडी तवा

काटवटीवर ती भाकर थापायची 

अन अलगद उचलून तव्यावर टाकायची

भाकरीवरून पाण्याचा प्रेमळ हाथ फिरवायची 

भाकर हळूहळू भाजायची तशी तिची धाकधूक वाढायची 

अन भाकर जेव्हा टम फुगायची 

तेव्हा जगातली सर्वोत्तम कविता तयार व्हायची ...

ती भाकर उलथण्याशिवाय हळूच उलथयाची 

व्यवस्था कशी उलथयाची असते 

मी तेव्हाच शिकलो ...

भाकर आता आरावर भाजली जायची

विस्तव आणि भाकर यांच्या संघर्षात पापूडा तयार व्हायचा 

अन तिच्या कलेची अदभूत प्रतिकृती ...

गरम दुधात गरम भाकर मिसळली जायची 

दुधाचा काला व्हायचा 

त्या अव्यक्त चवीचा आस्वाद मी फुरक्या मारत घ्यायचो 

तेव्हा खायचो मी अन पोट तीच भरायचं ...

बाप जेवायला बसायचा अन कालवणात मीठ नाही म्हणून

रोज शिव्या द्यायचा

पण तिच्या

भाकरीला नाव ठेवणं 

त्याला कधीच जमलं नाही 

शिव्या ती गप ऐकून घ्यायची  

आणि आपलं सार कसब पणाला लावून 

पुन्हा भाकर फुगवयाची ...

भाकरीतून निघणाऱ्या वाफावाफांतून 

ती व्यक्त व्हायची ...! 


Rate this content
Log in

More marathi poem from Nitin Jadhav

Similar marathi poem from Inspirational