STORYMIRROR

Nikhil Patil

Abstract Tragedy

3  

Nikhil Patil

Abstract Tragedy

भाकर..!

भाकर..!

1 min
156

भाकरीच्या कायजीनं....

मले भेव लागे देवा...

जथी कोणाची ना चाले

तथी माला काय खेवा...

भाकरीच्या कोरीसाठी

जीव झिंजते रे देवा....

लागे चटके हाताले....

नाही कोणती रे दवा....

लेकराच्या भुकीपायी

तुयी करतो रे सेवा...

नाई कायजी रे मले...

कदी खाईल मी मेवा...

दिनरात घामीजतो,

उनातानांत रे बावा..

नाई पायत कदिरे...

माल्या उरातल्या घावा

शिवारात माल्यासंग,

ते बी जीव जायतेना...

नाई जात पोटाच्यानं,

कदी मायेराच्या गावा....

लेकराच्या संगतीनं

कसे दिस काळतोना...

काय सांगू देवा तुले,

जिनगीची झाली दैना....

पिकापाण्याचा भरोसा

वाटते रे जवा कवा...

सरकार देते च्याटा....

माल्या शेतकरी भावा...

एका भाकरीच्या पायी

किती मांगतल्या दुवा...

पोटातल्या वेदनेले .....

किती माराव रे खिवा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract