भाग्यवंत
भाग्यवंत
बाप पांडुरंग माझा
आई विठाई माझीच,
घरापुढे तुच्छ वाटे
रूप सजल्या पंढरीच...
ना भक्तीची आशा
ना कुठला नवस,
मजला आकार देण्या
ते झीजले रात्रंदिस..
बापान हाकला नांगर
आईन खुरपलं रान,
तयाच्या जिंदगी पुढं
फिक वाटते पुरान..
ठेच पाई लागता
आईला मारली हाक,
भव्य महापुराचाही
बापासमोर काय धाक...
आई-बाप माझ्या साठी
प्रेमाचा आसमंत,
गरज ना मंदिराची
कदाचित मीच भाग्यवंत...
