ती आणि मी
ती आणि मी
मी चार ओळीची चारोळी,
ती आकाशगंगेची कहाणी..
मी फकिर राज्यामधला
ती राजवाड्याची राणी...
ती किरकिर राशी धावत्या शहराची
मी निरव शांतता गावाची
ती कोरी पाटी इंग्रजांची,
मी काळी माती भारताची..
ती नाईट क्लब पब & थेटर,
मी चकरा मारी पाहरेकर..
ती मॅकडॉनल्ड्सचा पिझ्झा बर्गर,
मी ठेचा संग ज्वारी भाकर..
ती पिवळी चमक कलशाची,
मी धुराळ माती पायथ्याची..

