बेभान क्षणी
बेभान क्षणी
चांदण्या रात्री या बेभान क्षणी
तुझ्या आठवणींचा झुला
जोरात झुलतो
माझे मन बेभान होऊन
तुझी वाट पाहते.
असे वाटते तू यावं त्या क्षणाला
घेऊन ओठांचा ताबा
नखशिखांत धुंद करून
प्रेमाने मज न्हाऊन घालून.
त्या बेभान क्षणी तुझ्याच मिठीत
मग मी विरघळून जावी.

