बावरे मन..!
बावरे मन..!
काही कळायचे नाही
या बाव-या मनाचे..
हिंडायचे चोहीकडे
अन नको तिथे पोहचायचे..
तिच्या प्रांजळ हसण्याच्या
शोधात नित्य असायचे..
तिच्या गहि-या तांबूस
डोळ्यांत निष्पाप फसायचे..
हसणे ही कसे जहरी तिचे
वाटायचे प्राण जाईल कोणाचे..
पण तिच्या जहरी हसण्यात
मला मरायला आवडायचे..
अशी ती वेडी मुलगी
बाव-या मनाला भावली..
कुणास ठाऊक कशी कधी
झाली आयुष्याची सावली...

