STORYMIRROR

Niranjan Salaskar

Others

2.5  

Niranjan Salaskar

Others

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा!

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा!

1 min
27.6K


 

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा.

आणी थेंबाथेंबानं त्यात भिजुनी गेलो.

निशब्द, निस्तब्द फक्त तुझाच विचार करत

मी क्षणाक्षणाला झिजुनी गेलो. 

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा

आणी डोळ्यासमोर आली आपली पहिली भेट.

बेधडक निर्भिडपणे प्रेमाचं विचारले होते थेट

पण तू मात्र उत्तर द्यायला केलास थोडा लेट. 

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा.

आणी आठवले ते दिवस सौख्याचे.

तुझा हात माझ्या हातात घेऊन जगाला विसरायचे.

होते ठरवले ते फक्त एकमेकांत रहायचे. 

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा.

आणी तुझे ते अवखळ हसणे आठवले.

नकळत तुझ्यातच गुंतुन राहिलो.

आणी मी माझेज हसणे विसरलो 

आज पुन्हा पाऊस पडला तुझ्या आठवणींचा.

आणी आठवला तुझा निरोप आपल्या वेगळे होण्याचा.

काही ताळमेळचं बसत नव्हता तुझ्या बोलण्याचा

आणी विश्वासच उडाला आपल्या प्रेमावरचा

 


Rate this content
Log in