बाबासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर
ना जन्मला
पुत्र ऐसा
कुणाच्या अंगणी
मानवतेचा संदेश
पोहोचविला
जगताच्या मणी.........// धृ //
बुद्ध होऊनी
शूद्र जागविला
संविधाना प्रती
माणूस होहुनी
माणूस घडविला
मानवते पोटी..........// १ //
जातीपातीवर
करुनी सैहार
मनू ग्रंथ संपविला
फुलेंचे त्यांनी सहाय्य
घेऊनि महाडी
सत्याग्रह गाजविला.........// २ //
ज्ञानाच्या अन् शक्तीच्या
बळाने
संविधान ग्रंथ रचिला
सह्याद्रीच्या राज्याने मग
अवघा हिमालय गाजविला........// ३ //