Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dipak Shinde

Others

3  

Dipak Shinde

Others

तू तशी मी

तू तशी मी

1 min
11.9K

तू जशी तसे प्रतिबिंब माझे उमटू दे

तुझ्याच उरात मला पुन्हा जन्म घेऊ दे.......//धृ//

तुझ्याच सागराचा थेंब मला होहू दे

तुझ्याच कुशीत मला जन्मभर निजू दे.......//१//

तूच आई माझी बाप त्यांना होहू दे

तुझ्याच पोरांची बहीण मला होऊ दे.....//२//

संसारशी तुझ्या नाळ मला जोडू दे

तुझ्याच उदरात मला तीळ तीळ वाढू दे.....//३//

तुझ्याच खांद्यावरचा भार मला वाहू दे

तुझ्या हृदयाचे कैवल्य मज पाहू दे......//४//

थोडे कष्ट सहन करून ममत्व तुज येऊ दे

तुझ्या पोटी जन्म घेऊन भरून मला पाऊ दे....//५//

तू जशी तसे प्रतिबिंब माझे उमटू दे

तुझ्याच उरात मला पुन्हा जन्म घेऊ दे

Rate this content
Log in