बाबा तुमच्याविना
बाबा तुमच्याविना
बाबा तुमच्या विना हे जग वाळवंट भासते मला...
का? घेतली आकाशी भरारी अशी
का? सोडून गेलेस एकटे मला..
सांगा ना हो बाबा?
सावलीत तुमच्या रहायच होत मला..
कुशीत तुमच्या जगायच होत मला...
थोड हसायच होत... थोड रडायच होत .
पानावलेले डोळे, हाताने तुमच्या पुसायचे होते
तुमच्या कडून खूप काही शिकयच होत हो का ?
सोडून गेलेस मला
सांगा ना हो बाबा?
संस्काराचा आधार हवा होता मला..
आशीॆ्वादाने तुमच्या,सासरी जायचे होते मला ..
मन हे व्याकूऴ ऱडत बसते कधी कधी..
आठवण तुमची सतवते मला नेहमी नेहमी
सांगा ना हो बाबा कधी य़ेणार तुम्ही...
मी वाट पाहीन तुमची जन्मो जन्मी....
सांगा ना हो बाबा..?
आभाळ येते पण; पाऊस येत नाही.
आठवण येते पण ; चेहरा दिसत नाही.
पुढे गाय मागे वासरू ..
सांगा हो बाबा मी तुम्हाला कस विसरू.....