STORYMIRROR

Punam Tayade

Others

5.0  

Punam Tayade

Others

शिक्षकांच्या आठवणी

शिक्षकांच्या आठवणी

1 min
248

शिक्षक लाईफ खूप मजेशीर असते... 

अनुभव तुम्हाला गमतीशीर सांगते...

सर्वच म्हणतात सकाळी लवकर उठा...

पण झोप म्हणते थोडं सावकाश उठा... 


सकाळी सकाळी आम्ही शाळेत येतो... 

आणि पंचिंगसाठी धावपळ करतो.. 

घरापासून दूर तयार होतं नवीन विश्व... 

सुरुवात होते ओळखीने...


मग ‘मैत्रीने’ फुलतं आयुष्य...

ही अशी, ती तशी कुठल्या या साऱ्याजणी...

आणि कशा बनल्या एकमेकींच्या मैत्रिणी...

विद्यार्थ्यांची बडबड, lesson plan-   muster झंझट,

प्रिंसिपलची वटवट...


सर्वांचं डोकं होतं गरम...

पण, चिडीचूप सहन करणं हेच आमचं करम...

शाळेत कॅमेऱ्याचा आमच्यावर वॉच असतो...

तरी पण आम्ही गप्पा मारायला वेळ काढतो...


शाळेतच ज्ञानाचा गुरुमंत्र मिळतो... 

येथेच शिस्तीचा खरा नियम लागतो...


Rate this content
Log in