STORYMIRROR

yogesh ingale

Tragedy

3  

yogesh ingale

Tragedy

अशी सांज येते

अशी सांज येते

1 min
177

अशी सांज येते,

तशी ती जाते. 

जाता जाता लवलवत्या पापण्यांनी 

माझ्या हृदयाची कंपने वाढवते. 


अशी सांज येते,

भास्करा क्षितिजापार घेऊन जाते. 

तो जाता जाता ती त्याच्या किरणात न्हाऊन निघते. 


तिच्या पाठमोऱ्या सावलीकडे मी पाहतो,

तिने पुन्हा फिरून मागे यावे,

मला बिलगावे अशी आस धरून बसतो. 


अशी सांज येते,

वेळ पुन्हा कातर, कातर होते. 

तिचेही पाऊल पावलात घुटमळते. 

मागे वळून तिची नजर मला शोधत राहते. 


मी दिसता तशी ती धावत येते,

नजरेला नजर भिडते. 

आमच्या श्वासाची घालमेल,

त्या सांजेला कळते. 


अशी सांज येते,

ती माझ्या मिठीत असते,

शब्दांना जागा नसते,

मात्र अश्रूंना वाट मिळते. 


ओघळता तिचे अश्रू,

ती सांजही रडते,

म्हणून कदाचित ती पावसाला हाक मारते. 


तो गडगडून येतो,

सारं काही भिजवून टाकतो. 

मी मात्र तिच्या डोळ्यातल्या काळ्या ढगाकडे बघत ओलाचिंब होतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy