STORYMIRROR

yogesh ingale

Others

3  

yogesh ingale

Others

ह्यांचं प्रेम असं का असतं?

ह्यांचं प्रेम असं का असतं?

1 min
122

ह्यांचं प्रेम असं का असतं, हेच मला कळत नाही

प्रेमाचं गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही

ह्यांचं प्रेम म्हणजे उडत्या पाखरासारखं असतं

कधी ह्या फांदीवर, तर कधी त्या डहाळीवर जाऊन बसतं

मात्र ह्यांचं बस्तान कधीच एका झाडावर नसतं

ह्यांचं प्रेम असं का असतं, हेच मला कळत नाही

प्रेमाचं गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही

अरे जनावर तरी थकल्यावर आपल्या गोठ्यात जाऊन बसतं

ह्यांचं मात्र लग्नानंतरही Extra Affair हे चालूच असतं,

कधी हिला Hi तर कधी तिला Bye

हे ब्रीदवाक्य ह्यांचं ठरलेलंच असतं

ह्यांचं प्रेम असं का असतं, हेच मला कळत नाही

प्रेमाचं गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही

ह्यांचं प्रेम म्हणजे Football मधल्या Goalkeeper सारखं असतं

दुसऱ्यांनी लाथाडलेल्या चेंडूला ह्यांना नेहमीच झेलायचं असतं

ह्यांचं प्रेम असं का असतं, हेच मला कळत नाही

प्रेमाचं गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही

ह्यांचं प्रेम हे असलेल्या ऋतुचक्रापेक्षा वेगवान असतं

ऋतू तरी वर्षातून तीनदा कूस बदलतो

ह्यांचं मात्र महिन्यातून एकदातरी Breakup झालेलंच असतं

ह्यांचं प्रेम असं का असतं, हेच मला कळत नाही

प्रेमाचं गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही

ह्यांचं कधी Rita च्या केसांवर, Neeta च्या ओठांवर, Meeta च्या डोळ्यांवर तर आणखी कुणाकुणाच्या कशाकशावर प्रेम असतं

इथ वासनांचं नुस्तं अतिक्रमण असतं

प्रेमाचं भ्रमण मात्र कधीच झालेलं नसतं

ह्यांचं प्रेम असं का असतं, हेच मला कळत नाही

प्रेमाचं गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही

Rate this content
Log in