STORYMIRROR

Sakshi Harane

Inspirational

4  

Sakshi Harane

Inspirational

असावे आयुष्यात असे कुणीतरी..

असावे आयुष्यात असे कुणीतरी..

1 min
344

रुसताना हसणारे तर कधी ,

हसता हसताच रडणारे..

ओलांडुन सीमा प्रीतीच्या ,

विश्वास मनी जपणारे...

   हवे असे आयुष्यात कोणीतरी,

  निस्वार्थी आठवणीत झुरायला लावणारे..

   अंतर कितीही असले तरी,

   संवाद अलगद बहाण्यात साधणारे....

इंद्रधनुष्याची कमान पाहताना,

आपसूकच नजरेत असे डोकावणारे..

पाझर फु ट ताना अश्रूंचा कधी,

ओंजळ बनुन आधार देणारे.....

    प्रकाश ज्योत बनुन आयुष्याला,

   खरा उजाळा देणारे...

   असावे आयुष्यात असे कुणीतरी,

   मी नसताना ही माझे अस्तित्व जाणणारे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational