STORYMIRROR

Sakshi Harane

Others

3  

Sakshi Harane

Others

बंधिस्त मनाची दारे...

बंधिस्त मनाची दारे...

1 min
476

पकड मजबूत बनते कुणाची तरी,

ज्यात अडकून बसते मन...

चलबिचल ,हताश होऊन वादळात,

जणू गर्जते बनुन घन....


   बरसते दिशाहीन निशब्द होऊन ,

   कधी ओलांडून पर्याय झरोक्यातुन पाहतं...

   बोलायचं तर खूप असतं पण,

   ते कायमच अबोल राहतं....


गोंदण बनतं आणि पुसून ही जातं,

काळोखा च्या भीतीने उदासिनतेला बिलगते...

संवाद चालू आहे असं गृहीत धरून,

वेडे फक्त आश्वासक चित्रात जगते....

    

    डोकावून पहावं कुणीतरी तर असतात,

    ही बंधिस्त मनाची दारे....

    कोलमडून पडलेल्या विश्वासाला मग,

    कधी तरी कुशीत घेतात आठवणींचे वारे..


गर्दी - गर्दी असते नुसती धावपळ ,

वाऱ्याला असे कुणीच येत नाही स्थिर...

म्हणूनच तर होत नसेल ना,

हे गोंडस ,निरागस मन अस्थिर.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन