अपूर्ण स्वप्न
अपूर्ण स्वप्न
स्वप्नांची तर एकच व्यथा
अपूर्णच असते ती कथा ।
जेव्हा जेव्हा मी बघतो स्वप्न
घडते उलटे नशीबाचाच ताता ।
मनात होते स्वप्नांचीच गाथा
सरते आयुष्य पाहता पाहता ।
अंत समयी मग कळते सारे
होतो माझा मीच विधाता ।
