अनोळखी पाऊस
अनोळखी पाऊस
मी चिंब भिजलेले ..कारण
छत्रीच न्यायला विसरलेले
तो आला मला भिजवून गेला
आत्ताच घरी पोहचलेले
तर …दाराची बेल वाजली
ओलतीच मी ..दारं अुघडलं
आत्ताच बाजारात भेटलेला तो
अन् मला भिजवूनही गेलेला तोच
पण तरीही अनोळखीच …
तोच अनोळखी कुणी….
अचानक दारात अुभं राहीला
पागोळ्यांतून ओघळत
अुंबरठा माझा..,
शिंपडून …निघूनही गेला
अनोळखी का तर ….
खूप दिवसं येणं नाही
खूप दिवसं पहाणं नाही
मनसोक्त कोसळणही नाही
संध्याकाळचं आभाळ भरून आलेलं
पण त्याला कुणाचंचं
साधं आमंत्रणही नाही
तरी तो आला…
वातावरणात अजून गारवा
भरभरून भरून गेला
अनोळखी तो … बेधुंद
अेक-दोन परतीच्या आनंद सरी
अचानक बरसवून गेला
अनोळखी कुणी आज….
अचानक दारात अुभं राहीला
पागोळ्यांतून ओघळत
अुंबरठा शिंपडून निघून गेला…

