STORYMIRROR

anjali Bhalshankar

Action Inspirational Others

3  

anjali Bhalshankar

Action Inspirational Others

अंधभकत

अंधभकत

1 min
195

धर्मांच्या ठेकेदिरांनी स्वरूप बदलले आहे

सावध रहा बांधवांनो

थंड डोक्यांची तुफाने

भोवतालीच वावरत आहेत


आकाशाला छिद्र पाडण्याचा

पोरकट यज्ञ सुरू आहे

थेंबाथेंबाने सुर्याला विझविणयाचे

छद्मी पोरकट षडयंत्र सुरू आहे


गटागटाला विभागुन

समतेचा पाठ सुरू आहे

सावध रहा बांधवांनो

थंड डोक्याची तूफाने

भोवताली वावरत आहेत


जाती निर्मुलनांच्या

भाकड कथा तुकड्या तुकडयात

ङवाटल्या जात आहेत

विचारांचे सुरुंग कोवळ्या मनामध्ये

सुद्धा कावेबाज पणे पेरले जात आहेत


ज्ञानसुर्याला झाकोळून

फडफडणारया दिव्यांचे

अंतिम डाव टाकणे सुरू आहे

धर्माच्या शस्राला पाझर लावणंही

बेमालूम पणे सुरू आहे


बा भीमा तुला ऊभा जन्म

फक्त तुलाच समजुन घ्यायचे आहे

आभाळातला तो सुर्य धरणी वरचा

तु दुसरा तुझ्या तेजाच्या सामर्थ्याचा

एक किरण मला दे

इथल्या क्रूर कपटी छद्मी षडयंत्राशी

मला माझ्या नसानसात

भिनलेलया तुझ्या विचारांनीच

लढायच आहे


Rate this content
Log in

More marathi poem from anjali Bhalshankar

Similar marathi poem from Action