Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

khushal sorate

Tragedy Inspirational

4  

khushal sorate

Tragedy Inspirational

अनाथांची आई माझी आई...!

अनाथांची आई माझी आई...!

1 min
735


आई तुझा जन्म व बालपण

महाराष्ट्रातील वर्धा जंगली भागातील नवरगाव हिच तुझी जन्मभूमी,

नको असताना मुलगी झाली म्हणून तुझ चिंधी नाव आस ठेवले,

आई तू बुद्धिमान आहेस तरी ही जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकलिस...!


आई तुझा विवाह ९ व्या वर्षी झाला

आणि तू प्रचंड सासुरवास सहन करत सपकाळ नाव मिळवलस,

सापडलेले कागदाचे तुकडे घरी आणायचीस,

क्वचित घरी असली तर अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचीस...!


आई जीवनातील संघर्ष तुझा गुरांच्या गोठ्यात आणि एका मुलीला जन्म देऊ झाला,

आई नवरयाने हकलल्यानंतर गावकरयानीही हाकलले तुला,

स्टेशनवर चतकोर भाकरिसाठी व उष्टावलेले फळ हाती लागेल म्हणून फिरत होतीस,

आई तू आत्महत्येचा प्रयत्न केला पण पोटच्या मुलीचा जीव घेतला म्हणून पाप लागेल

असा तू विचार केलास, मुलीला जवळ घेत स्वतः ला धीर देत तू माग फिरलीस...!


आई तू अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनला दिशा देण्यासाठी ममता बाळ सदन संस्थेची स्थपना केलीस,

बेवारस मुलांना आधारच काय खऱ्या आईची माया देवून भोजन कपडे स्वावलंबी होण्यासाठी शिक्षणासाठी ही सोय करुन दिलीस,

हजारो युवक युवतीना जोडीदार शोधून विवाहाची रेश्मी गाठा बांधून दिलीस...!


आई तू एकच आहेस आम्हा सर्वाना म्हणून नाही समजत अनाथ स्वतःला,

येतील काळ एक एक करुन बेकार आमच्यावर,

तुझा आधार, तुझी माया हेच आमच डोक्यावरच छप्पर आणि घर,

साऱ्या दुनियाच्या काळजातली एकच आई तू ,

अनाथांची आई माझी आई...!


Rate this content
Log in