STORYMIRROR

Vaishnavi Choukekar

Inspirational

4  

Vaishnavi Choukekar

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
210

जन्माला आला आहेस,

थोडं जगून बघ,

जीवन खुप सुंदर आहे,

जरा डोळे उघडूनबघ.


जीवनात सुखासोबत दु:खही आहे, 

थोडंतेही सोसून बघ,

चिमुटभर दु:खाने कोसळू नकोस,

उद्याच्या सूर्याकड नव्या उमेदीने बघ.


नाती तोडणं सोपं आहे,

एकदा ती जपून बघ,

दु:खाच्या वेळी तुला,

कोण मदत करतंय हे निरखून बघ.


दु:खाचे पहाड चढून बघ,

यशाची चव चाखून बघ,

अपयश येतंय निरखून बघ,

आयुष्य संपवणं सोपं आहे,

चांगली सुरुवात करून बघ.


घरटं बांधणं सोपं नसतं, 

तरी मेहनत करुन बघ.

आकाशाला हात लागले,

तरी कायम मातीकडे झुकुन बघ.


जगणं कठीण ,मरणं सोपं आहे,

दोन्हीतल्या वेदना झेलून बघ.

आयुष्य एक कोडं आहे,

जाता जाता ते सोडवून बघ... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Vaishnavi Choukekar

Similar marathi poem from Inspirational